Sunday, November 13, 2011

अडखळणं

नेहमीचाच रस्ता असतो, पण एखादवेळी ठेच लागते, तोल जातो. ती जागा मात्र कधीच विसरायला होत नाही. एखादं सवयीचं वाक्य बोलताना कधीतरी शब्द चुकतात; पण त्यापुढे मात्र ते शब्द नेहमीच सावधपणे उच्चारले जातात. एकदा खिशातलं पाकीट गेलेलं असलं, तरी उठता बसता खिशाला हात लावून तपासून बघायची सवय जडते. याउलट, कधीकधी अगदी डोक्यात फिट्ट बसवलेली गोष्ट सुद्धा ऐनवेळी आठवत नाही. १० वेळा घोकलेला टर्न न घेता आपण पुढे जातो.  खूप सराव केलेलं गणित परिक्षेत मात्र नेमकं सुटत नाही. माणसाच्या मनाचं असंच असतं;’अडखळलेल्या जागा नेहमी लक्षात रहातात; आणि लक्षात ठेवलेल्या जागीच अडखळायला होतं.’ 
- अ. ज. ओक

5 comments: