Friday, November 11, 2011

कल्पना आणि वास्तव

माणूस एखाद्या गोष्टीची कल्पना करतो; त्या कल्पनेला फुलवतो आणि तिच्यात गुंतत जातो. पण ती गोष्ट जेंव्हा वास्तवात घडते, तेंव्हा ती त्या कल्पनेच्या तुलनेत फार वेगळी असते. हा किस्सा अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या महत्वाच्या गोष्टींबाबत ऐकायला, बघायला, अनुभवायला मिळतो.


कल्पना आणि वास्तव या गोष्टी दोन समांतर रुळांसारख्या असतात. त्यांच्यातलं अंतर कधीच मिटत नाही. अंतर कसलं; दरीच म्हणायला हवी. ही दरी जगातल्या प्रत्येकाने अनुभवलेली असते. अर्थात, त्या दरीची ’कल्पना’ कुणालाच नसते जोपर्यंत ती दरी ’वास्तव’ बनून समोर येत नाही. वेगळ्या शब्दांत म्हणायचं झालं तर मी असं म्हणेन की,



’कल्पनांना वास्तवाचा ठाव लागत नाही; वास्तवात कल्पनांचा टिकाव लागत नाही.’ - अ. ज. ओक.

7 comments:

  1. हे सत्य आहे,म्हणूनच हळव्या व्यक्ती ज्या कल्पनांना जवळ करतात त्यांना या वास्तव जगात राहताना अनंत क्लेशांचा सामना करावा लागतो !

    ReplyDelete
  2. @ प्रज्ञा: धन्यवाद!

    @ सौ. गीतांजली शेलार: खरं आहे. धन्यवाद, पोस्ट वाचल्याबद्दल आणि कमेंट बद्दल.

    ReplyDelete
  3. वास्तवात कल्पनांचा टिकाव लागत नाही... वाह वा! :)
    छान आहे...

    ReplyDelete
  4. What you see is reality..what you believe is what you imagine...kalpanecha patta mala thav nahi...astitvat mazya ti bhette kadhi

    ReplyDelete
  5. @ Arnika: थॅंक्यू !

    ReplyDelete
  6. @ Suyash: चांगलं आहे!

    ReplyDelete