Monday, November 7, 2011

एकमत

माणसं म्हटली की मतं आली. मतं म्हटली की मतांतरं आली; तशीच एकमतं सुद्धा. हे एकमत म्हणजे काय... तर दोन व्यक्तींचं एखाद्या गोष्टीबद्दलचं मत समान असणं. या एकमताची एक गंमत आहे. हे सोयीस्करपणे होतं किंवा होत नाही. एखाद्या सिनेमाबद्द्लचं, किंवा एखाद्या खेळाडूबद्द्लचं, अशी क्षुल्लक एकमतं वगळता एकमत या गोष्टीबद्दल मला असं म्हणावंसं वाटतं, की


‘एकमत, हे केवळ भीतीखातर, प्रेमाखातर, अथवा मतलबाखातर ‘होतं’. अन्यथा एकमत हे निव्वळ योगायोगाचं उदाहरण आहे.’
- अ. ज. ओक

2 comments: