फार पूर्वी जेंव्हा आधुनिक साधनसामुग्री विकसित झाली नव्हती, तेंव्हा माणसाचं वेळेचं गणित खूप सोपं असायचं. जसजसा काळ पुढे गेला, माणसाची प्रगती होत गेली, नवे शोध लागत गेले, तसं माणसाचं वेळेचं गणित आणखी क्लिष्ट आणि कठीण होत गेलं. वेळ कमी पडू लागला आणि उद्योग वाढत गेले.
मग शोधांचं मूळ उद्दिष्ट वेळ आणि श्रम वाचवणं असू लागलं. काळाच्या पुढे जाण्याची माणसाची धडपड वाढत गेली. माणूस काळाच्या पुढे जाण्यात यशस्वीही झाला. पण ते वेळेचं गणित काही सोपं झालं नाही. ते आजही क्लिष्टच आहे.
‘माणूस काळाच्या कितीही पुढे गेला, तरी वेळेच्या मागेच असतो.’ - अ. ज. ओक
In the times when there was absence of technological advancements, Time, was not a very precious commodity. As the world progressed, there were developments, discoveries and inventions. All aimed to save Time and Energy.
Ever since, time has always been short in supply. Even today, several time-saving devices, techniques are being developed, because
'Man, no matter how ahead of Time, is always behind 'Time' - A J Oka.
नेहमीचाच रस्ता असतो, पण एखादवेळी ठेच लागते, तोल जातो. ती जागा मात्र कधीच विसरायला होत नाही. एखादं सवयीचं वाक्य बोलताना कधीतरी शब्द चुकतात; पण त्यापुढे मात्र ते शब्द नेहमीच सावधपणे उच्चारले जातात. एकदा खिशातलं पाकीट गेलेलं असलं, तरी उठता बसता खिशाला हात लावून तपासून बघायची सवय जडते. याउलट, कधीकधी अगदी डोक्यात फिट्ट बसवलेली गोष्ट सुद्धा ऐनवेळी आठवत नाही. १० वेळा घोकलेला टर्न न घेता आपण पुढे जातो. खूप सराव केलेलं गणित परिक्षेत मात्र नेमकं सुटत नाही. माणसाच्या मनाचं असंच असतं;
’अडखळलेल्या जागा नेहमी लक्षात रहातात; आणि लक्षात ठेवलेल्या जागीच अडखळायला होतं.’
- अ. ज. ओक
माणूस एखाद्या गोष्टीची कल्पना करतो; त्या कल्पनेला फुलवतो आणि तिच्यात गुंतत जातो. पण ती गोष्ट जेंव्हा वास्तवात घडते, तेंव्हा ती त्या कल्पनेच्या तुलनेत फार वेगळी असते. हा किस्सा अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या महत्वाच्या गोष्टींबाबत ऐकायला, बघायला, अनुभवायला मिळतो.
कल्पना आणि वास्तव या गोष्टी दोन समांतर रुळांसारख्या असतात. त्यांच्यातलं अंतर कधीच मिटत नाही. अंतर कसलं; दरीच म्हणायला हवी. ही दरी जगातल्या प्रत्येकाने अनुभवलेली असते. अर्थात, त्या दरीची ’कल्पना’ कुणालाच नसते जोपर्यंत ती दरी ’वास्तव’ बनून समोर येत नाही. वेगळ्या शब्दांत म्हणायचं झालं तर मी असं म्हणेन की,
’कल्पनांना वास्तवाचा ठाव लागत नाही; वास्तवात कल्पनांचा टिकाव लागत नाही.’ - अ. ज. ओक.
माणसं म्हटली की मतं आली. मतं म्हटली की मतांतरं आली; तशीच एकमतं सुद्धा. हे एकमत म्हणजे काय... तर दोन व्यक्तींचं एखाद्या गोष्टीबद्दलचं मत समान असणं. या एकमताची एक गंमत आहे. हे सोयीस्करपणे होतं किंवा होत नाही. एखाद्या सिनेमाबद्द्लचं, किंवा एखाद्या खेळाडूबद्द्लचं, अशी क्षुल्लक एकमतं वगळता एकमत या गोष्टीबद्दल मला असं म्हणावंसं वाटतं, की
‘एकमत, हे केवळ भीतीखातर, प्रेमाखातर, अथवा मतलबाखातर ‘होतं’. अन्यथा एकमत हे निव्वळ योगायोगाचं उदाहरण आहे.’
- अ. ज. ओक
The word 'Career' is often pronounced by people like 'Carrier'. As far as my knowledge and understanding goes, I think that is not the right way to pronounce it. But anyways. For a moment if I assume, that it is pronounced that way, I can apply some logic behind it. Some people, have a pre-established family business which they take over and grow. Some people decide on a path to follow and stick to it. Some people just get too much into it. So,
I see 'Career'(Carrier) as something which is sometimes Carried Forward, sometimes Carried On with, and which some people get Carried Away with.
- A J Oka.
I was discussing with a friend of mine the other day about children, and their nature. The point that he stressed on is that everyone is born with a set of physical, mental and emotional qualities, which remain the same throughout his life and that is what we call it as a person's 'Nature' or 'Personality'. There is a saying that a child is like raw clay which is given a certain shape, by it's parents, by teachers, by friends, by society and so on. Continuing with that thought, my thinking was a little different. I agree with my friend's point, partially. A person is born with a set of genes; a set of qualities. These qualities get influenced or altered as the life progresses. Some new qualities are incorporated, some existing qualities are changed or aggravated. In short, Changes happen in a person's physical, emotional, mental traits as he grows up. Then I thought about it like this:
'A child is like a newly installed computer with a set of hardware, and an operating system. As life progresses, several software are installed on this computer. Going further, sometimes they prove to be performance boosters or sometimes there are compatibility issues.' - A J Oka.