Tuesday, December 27, 2011

लक्षण आणि गुणधर्म

रोज येणारे मार्केटिंग चे कॉल, रोज आपली वेळेची गणितं चुकवणारा ट्रॅफिक, रोज डोक्यात जाणारी गर्दी, रोज सोसायला लागणारी असुविधा, या रोजच्या गोष्टींबद्दल रोज राग व्यक्त केला जात नाही. त्या गोष्टी पहिल्या काही वेळा घडतात, दिसतात तेंव्हा आपल्याला खूप राग येतो. पण त्या सतत व्हायला लागल्या की, जरी राग तितकाच आला तरी तो तितक्या प्रखरतेने व्यक्त होत नाही. 

एखादी गोष्ट आपल्याला खटकत असते. त्याबद्दल वारंवार चर्चाही होत असते. पण कालांतराने त्या गोष्टीविषयी भाष्य करून आपली नाराजी दर्शविण्यातही आपल्याला स्वारस्य उरत नाही किवा तशी इच्छा उरत नाही. तरीही मनातली ती नाराजी कायम असते. तो राग नाहीसा किंवा कमी होत नाही. पण सोबतच्या व्यक्तींची धारणा, त्यांचा समज नक्कीच असा होतो की तो राग, ती नाराजी निवळली असावी किंवा गेली असावी. बदल लक्षणात होतो, गुणधर्मात नाही. कसं आहे, की,


’दगड बोथट झाला म्हणून त्याचा कठीणपणा कमी होत नाही.’  
- अ. ज. ओक

4 comments:

  1. वा! वा! आवडलेलंच आहे वाक्य!

    ReplyDelete
  2. rght on the mark...No other word...and so true again....I must say you have a very good observation power...keep it up....:)

    ReplyDelete