प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत.
संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं. मीरेचं प्रेम हे भक्तीरूप प्रेम होतं.
नेमका हाच प्रेम आणि भक्ती या गोष्टींमधला दुवा आहे. दोन गोष्टींचा एकमेकांशी दृढ संबंध आहे. जणु एकाच डोंगराची दोन शिखरं आहेत, प्रेम आणि भक्ती. धाग्याचं एक टोक जर भक्ती असेल तर त्याच धाग्याचं दुसरं टोक प्रेम आहे. आणि तो धागा म्हणजे सात्विकता.
‘सात्विक प्रेम म्हणजे भक्ती होय; आणि सात्विक भक्ती म्हणजे प्रेम.’
- अ. ज. ओक

No comments:
Post a Comment