Monday, May 27, 2013

आपली लाल

कोकणस्थ पिक्चर आला. त्याची चांगली वाईट परिक्षणं ऐकली, वाचली. एकूणच कोकणस्थांचं नाव घेऊन त्याभोवती हवी ती कथा बांधली गेली आहे, असं जाणवलं. फेसबुकावर कम्युनिटी यायला लागल्या कोकणस्थांचं नाव खराब करणा-या. एकूणच कोकणस्थ चर्चेत आले. तसं आपल्या समाजाला ट्रेंड फॉलो करायचं चांगलं माहिती आहे... सद्ध्या कोकणस्थ ट्रेंड मधे आहेत असं म्हणायचं.
मग समाजातले बाकी वर्ग कसे मागे रहावेत? तेही उद्योग करायला लागतील, आमचा समाज असा, आमचा समाज तसा. 'मराठा' असं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलेला टीशर्ट घालून मी बघितलं परवा एकाला. हसू आलं. इंग्रज खूप हुशार होते. त्यांनी समाजाची ही वर्गवार, जातिवार रचना बघितली आणि तेंव्हापासून रुजलेल्या ईर्शा, चढाओढ, दुजाभाव या बीजांना व्यवस्थित खतपाणी घातलं. 

 आजही तो मळा सुपीक आहे. आरक्षणं, आंदोलनं, हक्कांची लढाई अशी रसाळ फळं त्या मळ्यात पिकतायत. अशिक्षित मंडाळी सोडा, शिक्षित लोकांचीही वैचारिक पातळी अजून भुईतच आहे.
खरं तर,
'भारतीय समाजाला दोनच गोष्टी येतात. आपली 'लाल' करणं, किंवा दुस-याचं 'काळं' करणं.'
- अपूर्व ओक

No comments:

Post a Comment