Wednesday, August 22, 2012

(अ)व्यवस्थितपणा

शर्ट, पॅंट किंवा काहीही, हातात घ्यायचं, गोल गोल असं ४ वेळा फिरवायचं, की जो गोळा तयार होतो तो एका हातात धरायचा, दुस-या हाताने खण उघडायचा, आणि तो गोळा मोकळ्या जागेत नेम धरून भिरकवायचा. अशीच असते ना कपडे ठेवायची पद्धत ! कपडे काय, किंवा इतर कुठलीही गोष्ट काय, साधारण अशाच पद्धतीने ठेवायची, किंवा काढायची असते. म्हणजे, जगात एक मोठ्ठा वर्ग आहे जो ही पद्धत योग्य मानतो.

दुसरा जो वर्ग आहे तो एक ‘व्यवस्थितपणा’ नावाची थियरी आहे, त्यावर विश्वास ठेवतो. त्यानुसार कपड्यांची घडी करणं, गोष्टींचे रकाने राखीव ठेवणं, वह्या, पुस्तके, कागद वगैरे गोष्टींचं वर्गीकरण करणं वगैरे क्रीया करायच्या असतात. त्यांच्या मते:-
१) असं केल्याने गोष्टी हव्या तेंव्हा पटकन मिळतात. (पण असंच पहिल्या वर्गालाही वाटतं.)
२) असं केल्याने खण/खोली नीटनेटके दिसतात. (पहिल्या वर्गाच्या मते हे मानण्यावर आहे.)


तर अशी मतांतरं आहेत. दोन्ही वर्ग आपापल्या पद्धतींवर ठाम आहेत. त्यांना आपापल्या पद्धतीच फायदेशीर वाटतात. आणि त्यामागील कारणंही तितकीच सबळ वाटतात. पण यामुळे घरोघरी जिथे हे दोन वर्ग एकत्र नांदतात, तिकडे त्यांत खटके उडत असतात. मी पहिल्या वर्गात मोडतो. :D
तर; ‘बॉटम लाईन’ अशी आहे की,


‘अव्यवस्थितपणातला जो कम्फर्ट आहे ना कम्फर्ट, तो व्यवस्थित लोकांना कधीच कळणार नाही’
- अ. ज. ओक.

4 comments:

  1. खरं तर सगळ्या बाबतीत व्यवस्थित किंवा अव्यवस्थित कोणी नसतं ... त्यामुळे व्यवस्थीत्पणा बद्दल आपण "Moral high" stance घेऊ नये...

    कपड्यांच्या बाबत व्यवस्थित नसलेला माणूस आपल्या गाडी बद्दल / ती चालवण्याबद्दल अगदी व्यवस्थित असू शकतो ( नो hint or wink) .. तसंच आहार , स्वास्थ्य या बद्दल व्यवथित असलेली व्यक्ती आपले हिशोब , व्यावहारिक पत्रं , tax या बाबत गलथान असू शकते! अश्या भिन्न प्रकृतीची माणसं घरी- दारी सगळी कडेच एकत्र येतात ... हे समजून त्यांत वावरायला आपण शिकतो हे मात्र खरं !!

    ReplyDelete
  2. एक वेगळा विचार ......
    .
    वस्तू जशी व्यवस्थित ठेवता येते , तसे सुख , दु:ख ठेवता आले तर ?
    .
    पहिल्या प्रकारची माणसे सुख आणी दुख पाहिजेत तेंव्हा मिळवू शकतील ....

    दुसर्या प्रकारच्या माणसाना कधीही कोणती गोष्ट हाती लागते ...
    तसे नकळत त्याना सुख किंवा दुख हाताला लागेल....

    ReplyDelete
    Replies
    1. Surekh wichar ahe Chaitanya Sir; kharach uttam. Wachun khup aanand zala. Ani ha wichar ithe maandlyabaddal khup dhanyawaad.

      Delete