Friday, June 22, 2012

हापूस

आंबा. फळांचा राजा. कोकणात याचं मूळ असलं तरी अख्या जगात याचं खूळ आहे. दुबई च्या राजा ला वगैरे सुद्धा आवडतो म्हणे आंबा. हापूस हा या फळांच्या राजाचा मुकुटच म्हणेन मी. पण Alphanso हे त्याचं नाव मला मुळीच आवडत नाही. Alphanso म्हटलं की तोच हापूस परका वाटायला लागतो मला.


हे सांगायलाच नको की मला आंबा प्रचंड आवडतो. पण काहीशी कक्षाबद्ध आवड आहे माझी. साधारण सगळ्यांना माहितच असेल की आंब्याच्या हापूस व्यतिरिक्त इतर अनेक जाती आहेत. पायरी ही त्यातल्यात्यात वरच्या पायरीवर असलेली जात. मग दशहरा, लंगडा, तोतापुरी, केसर, फज़ली, नीलम वगैरे वगैरे. काही चाखल्यात मी यातल्या पण रुचली एकही नाही. खरं बघायला गेलं तर आंबा = हापूस. इथेच विषय संपतो. माझ्यापुरता तरी. हापूस सारखा दुसरा कुठलाच आंबा नाही; दुसरं कुठलंच फळ नाही. त्यामुळे मला,



‘हापूस सोडून आंब्याच्या इतर जाती म्हणजे केवळ हापूस ची सर गाठण्याचे निष्फळ ठरलेले प्रयत्न वाटतात.’
- अ. ज. ओक

4 comments:

  1. आतच जर्मनी मध्ये ११ युरो डझन ह्या भावाने हापूस खाल्ला.
    सदर आंबा नवीन मुंबईतून आला होता.
    तो हापूस होता खरा पण चवीत थोडे उन्नीस, बीस झाले.
    मी काही जाणकार नाही.
    पण काहीच न मिळण्यापेक्षा जे मिळाले त्यात आनंद मानला.
    कारण आनंद शेवटी मानण्यावर असतो.
    तुमच्या लेखामुळे माझ्या स्मृती चाळवल्या गेल्या.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद निनाद!. आनंद मानण्यावर असतो हे खरं आहे.

      Delete
  2. Punyatun Desai Bandhu kadun USA California madhe hapus cha box magavala.
    100 dollors ghetat, pan hapus la tod nahi.

    ReplyDelete