Monday, June 18, 2012

काय दिलं?


आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी देते. छोट्यात छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते, सांगते, देते.

तुम्हीच तुम्हाला प्रश्न करून बघा, उत्तरं मिळत जातील. जसा मी विचार करतो की; शाळेने काय दिलं?... चांगले शिक्षक दिले, ज्ञान दिलं, चांगले मित्र दिले, संस्कार दिले, नेहमी साथ देतील अशा आठवणी दिल्या. कॉलेज ने काय दिलं?... करियर कडे बघण्याचा दृष्टिकोन दिला, ’बीकॉम’ अशी पदवीरूपी ओळख दिली. CPA ने काय दिलं?... अभ्यासाचा practical approach दिला, अमेरिकेशी ओळख करून दिली, International (तरीही भारतातल्या अनेक बिंडोकांना संबंधित क्षेत्रात काम करत असूनही माहीत नसलेलं) Qualification दिलं. अशा अनेक अनेक गोष्टी.


अशीच एक फार मोठी गोष्ट. CA. अनेक वर्ष हातात हात, नव्हे गळ्यात गळा घालून जी गोष्ट माझ्याबरोबर होती, म्हणजे माझ्या मानगुटीवर बसली होती, तिने खरं तर बरंच काही दिलं असलं पाहिजे; आणि आहेच. पण तरीही एकच देणं नमूद करायचं झालं तर;

CA ने काय दिलं?... कोडगेपणा दिला.
- अ. ज. ओक

No comments:

Post a Comment