Wednesday, February 15, 2012

डे चे ’फन’डे

पाश्चात्य संस्कृतीतल्या चुकीच्या गोष्टीच नेमक्या भारताने उचलल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.

कालच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला. या ’डे’ विषयी बोलताना अनेक जण “या’डे’पणा’ आहे’ असं म्हणतात, अनेक जण तो हॉटेलात जाऊन, भेटकार्ड देऊन, सिनेमा बघून साजराही करतात. आणि एक पंथ असं म्हणणा-यांचा असतो की प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कशाला हवा?... ते रोज आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त झालं पाहिजे वगैरे वगैरे. आणि हाच नियम मग मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे सगळ्यांना लागतो.. ते सगळे ’डे’ सुद्धा चुकीचे किंवा अनावश्यक ठरतात.

काल माझ्या एका सहकर्मचा-यांशी सहज याविषयी बोलत होतो, तर त्यांचाही विचार वर मांडल्याप्रमाणेच दिसला; की हा दिवसच कशाला... इत्यादी. मला याबद्दल असं वाटतं की,

’... जसं गणपती समोर आपण रोजच हात जोडतो, तरीही संकष्टी चं महत्व वेगळं असतं, विठठलाचं नाव नेहमी मुखात असलं तरीही आषाढी - कार्तिकी ची ओढ आगळी असते, तसंच काहीसं या ’डे’ज बद्दल आहे...’


मी म्हटलंही त्यांना तसं. अर्थात, व्हॅलेंटाईन किंवा इतर कुठल्याही डे च्या नावाखाली जे गैरप्रकार आणि जी फालतूगिरी चालते, त्याचं मी मुळीच समर्थन करत नाही, किंबहुना त्याला माझा तीव्र विरोध आहे. एवढंच म्हणणं आहे, की या संस्कृतीतला जो चुकीचा भाग घेतलाय त्याला विरोध करणं ही एक गोष्ट झाली; पण त्या संस्कृतीला आपल्या परंपरेनुसार वळण देऊन जर त्यातील पटतील ते सण, दिवस, रुचतील तसे साजरे केले, तर हरकत का असावी!

- अ. ज. ओक

6 comments:

 1. mala tuza mudda patala... agadi khara ahe he... asha baryach goshti ahet jya kade apan kinwa itar khup sankuchit vrutti ne baghato kinwa baghitala jaata... tyala ugachach Sanskruti vagaire shabdanchi fodani dili jaate ani. jasa tu sankashti chaturthi cha udaharan dilas tasach shivjayanti kinwa mahatma gandhi jayanti cha mhanata yeil. tya diwashi tyanchya naava ne gajar karun kinwa utsav sajare karun kay milat..? purna varsh bhar tar tyanchya 'ADARSH'an cha khun karat asata ki he sanskruti rakshak... Je Je changala ani yogya ahe te atmasat karana hi khari sanskruti nahi ka...?

  ReplyDelete
 2. आवडलं! इतर परंपरांना सामावून घेणं हे भारताच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि मुळात आपली संस्कृती इतकी अशक्त आणि तकलादू नाहीच आहे की ती जोपासण्यासाठी ‘इतर' संस्कृतींना वाईट म्हणायला लागावं. जितकं करू नका म्हणाल तितकं या Days चं महत्व वाढत जाणार! जे पटत नाही त्याला महत्व देऊ नका, That's it!

  ReplyDelete
 3. खरं आहे अर्निका. आणि माझ्या मुद्दयाचा आणखी एक पैलू म्हणजे, बहुतांश वेळी आपल्याकडे लोकांचा विरोध हा त्या सणाच्या नावाखाली चालणा-या आक्षेपार्ह किंवा न पटणा-या गोष्टींना असतो; पण त्यामुळे त्यातील पटणा-या गोष्टीही दूर सारल्या जातात आणि ’आम्ही त्यातले नाही’ असा अभिमानपूर्ण शेरा पदोपदी मारला जातो.

  ReplyDelete
 4. अ‍ॅग्रीड, चिन्मय. आणि कसं आहे मी म्हटलं तसं; की सगळंच आत्मसात करा असं नव्हे. पण पटेल ते घेऊन, रुचेल तसं साजरं केलं तरी वावगं नाही. विरोध त्या डे मागच्या भावनेला असतो; तर ती भावना आपण आपल्या दृष्टिकोनानुसार ’Mould' करून घ्यावी.

  ReplyDelete
 5. आवडलं..:)
  परदेशात राहताना तर थोडं-फ़ार तिथल्या गोष्टींना वेगळ्या अ‍ॅंगलने पाहिल्यामुळेही असेल पण स्वीकारलं जातं..माझ्या मुलाच्या डे-केअरमध्ये व्हॅलेंटाइन दिनानिमित्त पालकांनी एक दिवस मुलांबरोबर जेवायला यायचं ठरवलं गेलं..आमचं जेवण आम्ही घेऊन एक दिवस मुलगा कसा आपला आपला जेवतो हेही पाहीलं...आई-बाबा आपल्याबरोबर थोडा वेळ जास्त म्हणून मुलगाही खूश आणि त्या निमित्ताने बाकीची मंडळीही भेटली....काय वाईट झालं??

  ReplyDelete
  Replies
  1. Tech na. Chashmach waait thevla ki sagla waaitach dista.

   Delete