एक विनोद ऐकला होता. एका व्यापा-याला एकदा हृदयविकाराचा झटका येतो. शस्त्रक्रीयेनंतर जेंव्हा त्याला शुद्ध येते तेंव्हा जमलेल्या आपल्या मुलांना, बायकोला तिजोरी, गाडी, शेअर्स, याबाबतचे प्रश्न विचारतो. तिजोरी सुखरूप आहे, गाडीला काही झालं नाहीये, शेअर मार्केट तेजीत आहे वगैरे कळल्यावर अचानक दचकून विचारतो,"तुम्ही सगळे इथे आहात, मग दुकानात कोण आहे??"
अशी खरंच काहींची अवस्था असते. पैसा नसलेल्याला झोप न येणं रास्त आहे, पण अमाप पैसा असलेल्यांनाही झोप महाग होते. पैशाचा अति विचार किंवा अति पैसा आणि मग त्याचा विचार यापैकी एक आजार जडतो त्यांना. आणि मग त्यात असे गुंततात की सुटका कठीण होते. म्हणूनच,
'पैसे गुंतवावेत; पैशात गुंतू नये.' - अ. ज. ओक.

'पैसे गुंतवावेत; पैशात गुंतू नये.'
ReplyDeleteभन्नाट...
एक संस्कृत सुभाषित आहे,
ReplyDeleteअर्थानामर्जनेदुःखं व्यर्जितानां च रक्षणे
आये दुःखं व्यये दुःखं धिगर्थान कष्टसंश्रितान
मिळवताना दुःख, खर्च करताना दुःख आणि रक्षण करतानाही! खरं आहे!