Tuesday, August 9, 2011

मोठ्या हॉटेलांचं छोटं सत्य

सी-फूड म्हणजे माझ्या प्रचंड आवडीचा विषय. सी-फूड साठी प्रसिद्ध असलेल्या ’महेश लंच होम’ मधे काही महिन्यांपूर्वी गेलो होतो. पहिल्यांदाच. एकूणच वर्णनं खूप ऐकलेली होती त्यामुळे त्याबद्दलची, तिथे मिळणा-या पदार्थांबद्दलची उत्सुकता फार वाढली होती.

मेनू तर हॉटेल्सच्या तुलनेत लिमिटेड वाटला. पदार्थांच्या किमती पदार्थांच्या क्वांटिटीच्या व्यस्त प्रमाणात होत्या. म्हणजे अर्धी वीत पापलेट ची हातभर किंमत असा प्रकार. माशातल्या काट्यांपेक्षा त्या व्यंजनांच्या किमतींचे काटे जास्त खुपले. आणि एवढं असून पदार्थ जगावेगळे चविष्ट आहेत असंही नाही. त्यापेक्षा कोप-यावरच्या कुठल्याही मालवणी हॉटेलमधे जास्त भारी पदार्थ मिळतात. आणखीही काही अशी नावाजलेली हॉटेल्स बघून आलोय, तिथे खाऊन आलोय; आणि सगळीकडे माझी काहीशी अशीच गत झाली. एकूणच सगळ्या मोठ्या हॉटेल्स चा हाच प्रकार असतो. अर्थात हा सगळा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि इच्छेचा प्रश्न आहे. पण या प्रकारानंर मी मात्र म्हटलं,

’आकडे मोठे, आणि तुकडे छोटे’

- अ. ज. ओक

2 comments:

  1. As a Tamil friend stated it to me, "High class restaurant, low class food..low class restaurant, high class food!"
    he tu Marathit chhan pakadlays!

    ReplyDelete
  2. आकडे मोठे, आणि तुकडे छोटे...+++

    to the point...:)

    ReplyDelete