Saturday, August 13, 2011

कमळं, चिखल आणि इतर

‘आपल्याइथे म्हणजे ना...’, ‘नाहितर बाहेरच्या देशात बघा..’ या आणि अशा प्रकारच्या चर्चांचा आता कंटाळा येतो. वैताग येतो. कारण वेळ फ़क्त वाया जातो; बाकी काहीच होत नाही. 


गडबड, गोंधळ, (हे फार सौम्य शब्द झाले) चालूच असतात आणि रूटीन लाइफ ही चालू असतं. मधूनच एखादा फ़टाका नुसताच सुरसुरावा तसं कुणीतरी उभं रहातं, कुठल्यातरी मुद्याबिरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न करतं, चार दोन लोकं त्याला साथ देतात, मॅटर १० एक दिवस चालतं आणि सुरसुरलेला फ़टाका विझावा तसं विरतं. कधी उपोषणं, कधी मोर्चे, कधी मारामा-या. 
मग जनतेला (जनता हा फ़ार Ambiguous शब्द आहे) काय म्हणे Hope वगैरे वाटायला लागते, Change दृष्टिपथात आल्यासारखा वाटतो आणि काय नि काय. कुणीतरी मला म्हणालं त्या दिवशी की ’कमळं चिखलातच उगवतात’ and all. आता याला तुम्ही pessimistic म्हणा, negative म्हणा किंवा आणखी काही. पण,


‘चिखलात कमळं उगवली तरीही चिखल चिखलंच राहतो’ 
- अ. ज. ओक

1 comment: