Thursday, January 24, 2013

लेव्हल

टीव्ही वर; म्हणजे दूरदर्शन वाहिनीवर एक जाहिरात येते, प्रबोधनपर. त्यात एक कुत्रा असतो जो माणसांसाठीचा रस्ता ओलांडण्याचा सिग्नल हिरवा होईपर्यंत वाट बघून मग रस्ता ओलांडतो; आणि बाकी अनेक व्यक्ती ज्या हे असलं काहीही न करता रस्ता दिसेल तशा धावत सुटतात. ती आणि तशा अनेक जाहिराती दाखवून झाल्या पण गाढवापुढे... ची गोष्ट चालूच आहे. या विषयाचाच कंटाळा येतो आता. मी लाल सिग्नल ला मान देऊन उभा असतो शांतपणे आणि माझ्या मागून गाड्या येतात; हा काय ****** आहे बघा ! अशा आविर्भावाने बाजूने सिग्नल तोडून निघून जातात. या अशाच लोकांना ‘रांगेचा फायदा सर्वांना’ हे शाळेत किंवा त्यांच्या आईबाबांनी शिकवलेलं नसतं, त्याना QUEUE म्हटलं की हिंदीतलं ‘क्यूं?’म्हणायचं कळतं. त्यांना BMW मधून बाहेर थुकण्यात ‘स्टेटस’ वाटतो. त्यांना अशिक्षित म्हटलेलं झोंबतं, मग ते मवाल्यासारख्या शिव्या देतात. थोडक्यात काय,


‘लेव्हल गाठलेली माणसंच लेव्हल सोडतात’
- अ. ज. ओक

No comments:

Post a Comment