Tuesday, January 8, 2013

लाटण्याची लाट

आजकाल गोष्टी लुबाडण्याचा, लाटण्याचा, हिसकावण्याचा, बळकावण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे तिकिटाच्या रांगेतील जागेपासून ते शाळा-कॉलेज मधल्या जागेपर्यंत, बस-ट्रेन मधल्या सीटपासून ते राजकारणातल्या सीट पर्यंत, अध्यक्षपदं, अ‍ॅवॉर्डस पासून ते विजेतेपदं, रिवॉर्डस पर्यंत सगळ्या गोष्टी लाटल्या जातात, बळकावल्या जातात. मग लुबाडणा-यांना विजयसुख आणि लुबाडलं गेलेल्यांना वैफल्य असं हे समीकरण पूर्ण होतं.

जमिनी, मालमत्ता, या तर लाटल्या जाणा-या गोष्टींपैकी हिट गोष्टी. आता तर त्यांच्याबरोबर देवही लाटले जातायत. त्यांच्यावर हक्क सांगितले जातायत. दैवतं लाटली जातायत, देवळं लाटली जातायत. 



‘पण असं आहे की, जमीन लुबाडता येते, जमिनीवरचं प्रेम लुबाडता येत नाही. पदं, पदव्या हिरावून घेता येतात पण त्यांच्यासाठीची पात्रता हिरावून घेता येत नाही. लोकप्रियता लाटता येते, पण लोकमान्यता लाटता येत नाही.... देव लाटता येतील; पण भक्ती लाटता येत नाही. देवत्व तर त्याहून नाही.’ 
- अ. ज. ओक

No comments:

Post a Comment