कोकणात राहिलेल्या, जाऊन आलेल्या माणसाला कोकणातले रस्ते म्हणजे काय प्रकार असतो तो वेगळा समजावण्याची गरज नाही. आता डांबरी रस्ते आले पण अजूनही काही भागात मातीचा लाल रंग तुमची पाठ सोडत नाही. घराचा पत्ता सांगताना ‘पहिल्या वाकणानंतर’, ‘दुस-या वाकणावर’ असे शब्दप्रयोग सर्रास ऐकायला मिळतात कारण रस्ता वळणावळणांचाच असतो. खूप सरळ सरळ अशी वाट बघायलाच मिळत नाही मुळी. नुकतीच कोकणात एक फेरी टाकून आलो आणि विचार केला; ही कोकणातली वाट आणि आयुष्यातली वाट सारखीच असते. म्हणजे की,
वाट वळायची कधी टळत नाही;
आणि ती वळत नाही तोवर कळत नाही
- अ. ज. ओक
Mast re...he raahun gel hota waachyach.. :)
ReplyDelete