Friday, March 16, 2012

लोक

‘लोक’ हा एक फार मोठा आणि महत्वाचा ‘फॅक्टर’ असतो. बहुतांश लोकं प्रत्येक निर्णय घेताना, वागताना, बोलताना, हा लोक फॅक्टर केंद्रस्थानी ठेवतात. यामुळे मग काय होतं की एका वैचारिक कोषात माणूस अडकत राहतो, आणि अडकतच जातो.  मग वेळोवेळी ‘लोक काय म्हणतील?’, ‘चार लोकात बरं दिसेल का?’ असे प्रश्न आवडीनिवडींची, इच्छा-आकांक्षांची आणि पुढे विचारांची गळचेपी करायला लागतात.

याला वेगळं ‘पडायची’ भीती म्हणावं की वेगळं ‘करायची’ धास्ती ते कळत नाही. पण यामुळे अनेक होऊ शकणा-या गोष्टी होत नाहीत, अनेक घडू शकणारी व्यक्तिमत्व घडत नाहीत, अनेक विचार मांडले जात नाहीत, अनेकदा जे म्हणायचं असतं ते म्हटलं जात नाही कारण एकच; ‘लोक काय म्हणतील...’ माझा तीव्र विरोध असलेली ही एक संकल्पना आहे.
‘लोक काय म्हणतील असा विचार करत राहणा-यांना स्वत: कधी काही म्हणताच येत नाही; किंवा त्यांच्याकडे म्हणण्यासारखं काहीच नसतं’
- अ. ज. ओक

6 comments:

 1. सिद्धू म्हणाला होता, दुनिया में सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग !
  म्हणण्यासारखं नसतं नव्हे, पण म्हणण्यासारखं काहीतरी आहे हे ते हळुहळू विसरत जातात...

  ReplyDelete
 2. I like the way you have expressed your observations around "people as authority". However, I would encourage you to consider the side that this concept is not meant for (or adapted by) everyone.

  There exists a set of individuals who need constant assurance, feedback or approval. They need someone to fear; they need role models; they need to follow a leader. The concept of "people as authority" is important for them.

  The society has an opinion but it never asks us to do what they say, its our insecurities that accentuate our feelings. By "us" I mean an individual, a couple, a family, a group, a community or a religion. Some people turn independent after 40, some are independent since 18 (or younger), some people die depending on people!!

  There is always an option to unsuscribe :)

  ReplyDelete
  Replies
  1. Yes, what you say is true.

   It's about 'Insisting' which 'people' don't fail to.
   and Its about 'Resisting' which 'people' fail to.

   Delete