Sunday, September 18, 2011

पार्किंगची चोरी

(Disclaimer : The writer does not intend to criticize, insult, or offend any government authority in any way whatsoever.)

’अधिकृत उचल्यांशी’ गाठ न पडलेले दुचाकी, चारचाकी धारक विरळाच असतील. आपल्या ट्रकवजा वाहनातून दिमाखात आणि भीती दाखवत फिरणारे हे अधिकृत उचले सगळ्या शहरात असतात. पार्किंग ची समस्या सगळीकडे आहेच; त्यात गाडी उचलून नेण्याची भीती असते. त्यामुळे एकंदरित ’पार्किंग’ हा प्रकार फार त्रासदायक होतो.  
तसं मी तारखा बघून नीट गाडी पार्क करतो. तरीही एक नाही, तब्बल ६-७ वेळा माझी गाडी आरटीओ वाल्यांनी उचलून नेण्याची घटना घडलेली आहे. त्यात दादर चं नाव पहिलं आहे. दादर मधे पार्किंग करणं म्हणजे दिव्य आहे. गाडी अगदी व्यवस्थित पार्किंग असलेल्या ठिकाणी पार्क केली तरी मनात धाकधूक रहाते, की ही मंडळी कुठला पॉइंट काढतील आणि गाडी उचलून नेतील नेम नाही. पण खरंच, आता इतक्या वेळी पार्किंग आणि टोविंग चा अनुभव घेतल्यावर असं झालंय ना, की,

’रस्त्यावर पार्क केलेली गाडी, परत आल्यावर आरटीओ ने उचलून नेलेली नसली, की चोरी न करूनही पकडलं नं गेल्याचा आनंद मिळतो’

- अ. ज. ओक

2 comments:

  1. Hahaha! So very true...
    Chori na kartach pakadla janyacha bhay asna. Agdi kharay. Dadarla gaadi laawtana aapan kiti aatapita kela hota 'chori' na karnyacha!

    ReplyDelete