Sunday, October 28, 2012

भरली वांगी (बाहेरची)

ब्राम्हणी, कोकणी, कोल्हापुरी, पंजाबी, साउथ इंडियन, पुढे, इटालियन, मेक्सिकन वगैरे असं क्विझीन्स चं वर्गीकरण होण्याआधी; मुळात घरगुती आणि बाहेरचं असे खाण्याचे दोन मुख्य वर्ग होतात. बाहेरचं; म्हणजेच कॅटरर्स कडे उपलब्ध होणारं किंवा हॉटेल मधे मिळणारं खाणं, हे कितीही घरगुती म्हटलं तरी घरासारखं नसतंच. हे जागतिक सत्य आहे. अपवाद असतील; त्यांनी कृपया क्षमा करावी मला या वाक्याबद्दल. पण हे सत्य आहे. कारण एक व्यवसाय आहे आणि दुसरा नाहीये.
तर हे हॉटेल किंवा कॅटरर्स चं जे क्विझीन असतं ते;... छान असतं, पण बहुतांश पदार्थ इथे ट्रान्स्फॉर्म झालेले असतात. या बदलाचे पुन्हा दोन प्रकार आहेत.  काही पदार्थांची नावं तीच रहातात पण तो पदार्थ अंतर्बाह्य बदलतो. उलट, काही पदार्थ बदलत नाहीत पण त्यांच्या नावांत पराकोटीचे बदल होतात.

अनेक उदाहरणं देता येतील पण फार ‘चवीने’ आठवावं आणि लिहावं लागेल. आत्ता एकच उदाहरण सांगतो जे चटकन डोक्यात येतंय. ‘भरली वांगी.’ जगातली एक नंबर भाजी. त्याचं या हॉटेल/कॅटरर क्विझीन मधलं रूप भारी निराशाजनक असतं.‘कॅटरर्सनी/हॉटेलवाल्यांनी ‘भरली वांगी’ या पदार्थाचं नाव ‘भारली वांगी’ असं ठेवलं पाहिजे. कारण भरली वांगी म्हणून त्यात ‘भरलेलं’ काहीच नसतं. आणि ती मसाल्यात शिजवलेल्या तेलाने (आय मीन, तेलात शिजवलेल्या मसाल्याने) ‘भारलेली’ असतात.’

- अ. ज. ओक

2 comments:

  1. काय योगायोग आहे अपूर्व ! काल रात्रीच आम्ही घरी 'भरली वांगी' केली होती...पुष्कळ महिन्यांनंतर. साहजिकच आहे, आमची भाजी 'घरची' होती आणि कितीही रिसोर्सेस चे कंस्त्रेंत असले तरी घरची चव ती कशालाच येत नाही. आणि खास करून जगाच्या या भागात 'बाहेरची' भरली वांगी मिळणं ऑल्मोस्त इमपोसिबल आहे. त्यामुळे मी आणि एलायझा ने एकमेकांची पाठ थोपटली आणि मस्त भरली वांगी एन्जोय केली :)...एका जमान्यातली माझी हिट - फेवरीट भाजी होती!

    ReplyDelete
    Replies
    1. AREH ! Great ! I am sure bhaari zali asnar. Because efforts na taste aste re. And yes, I re-assure you Bharli Wangi is THE BEST dish in the world and till eternity.

      Delete