Tuesday, March 27, 2012

फेसबुकर्सची प्रतिज्ञा

फेसबुक. सकाळच्या न्याहारीच्याही आधी उगवणारी ही गोष्ट; मावळत तर कधी नाहीच ती. ‘तू फेसबुक वर नाहीयेस???’ हा प्रश्न विचारताना माणसाच्या चेह-यावर ‘तुमच्याकडे फ्रीज नाहीये???’ हे विचारतानाचं आश्चर्य असतं. लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, या सगळ्या निकषांच्या पलिकडे हे ‘फेसबुक’ जाऊन पोचलंय. माझाही ‘अकाउंट’ आहे बरं का तिथे ! :P   

तर सहज माझ्या मनात असा विचार आला, की भारताची प्रतिज्ञा जशी आहे, तशी समस्त फेसबुकर्सची प्रतिज्ञा जर असेल; तर ती काहिशी अशी....


Monday, March 26, 2012

वळणावळणाच्या वाटा

कोकणात राहिलेल्या, जाऊन आलेल्या माणसाला कोकणातले रस्ते म्हणजे काय प्रकार असतो तो वेगळा समजावण्याची गरज नाही. आता डांबरी रस्ते आले पण अजूनही काही भागात मातीचा लाल रंग तुमची पाठ सोडत नाही. घराचा पत्ता सांगताना ‘पहिल्या वाकणानंतर’, ‘दुस-या वाकणावर’ असे शब्दप्रयोग सर्रास ऐकायला मिळतात कारण रस्ता वळणावळणांचाच असतो. खूप सरळ सरळ अशी वाट बघायलाच मिळत नाही मुळी. नुकतीच कोकणात एक फेरी टाकून आलो आणि विचार केला; ही कोकणातली वाट आणि आयुष्यातली वाट सारखीच असते. म्हणजे की,



वाट वळायची कधी टळत नाही;
आणि ती वळत नाही तोवर कळत नाही


- अ. ज. ओक

Thursday, March 22, 2012

Dedication - Obsession

Everyone has desires. Of course, there are exceptions. But ignoring them, everyone has desires; and everyone makes a constant effort to fulfill them. Some let it happen at its own pace. Some are more sincere and work hard to reach their goals. Some just go overboard and do whatever it takes. 
Right or wrong isn't a question here since all are right in fulfilling their desires. But what categorizes them is the manner and degree of efforts.  



Dedication is when You are stronger than your Desire; Obsession is when your Desire overpowers You.

- A J Oka

Friday, March 16, 2012

लोक

‘लोक’ हा एक फार मोठा आणि महत्वाचा ‘फॅक्टर’ असतो. बहुतांश लोकं प्रत्येक निर्णय घेताना, वागताना, बोलताना, हा लोक फॅक्टर केंद्रस्थानी ठेवतात. यामुळे मग काय होतं की एका वैचारिक कोषात माणूस अडकत राहतो, आणि अडकतच जातो.  मग वेळोवेळी ‘लोक काय म्हणतील?’, ‘चार लोकात बरं दिसेल का?’ असे प्रश्न आवडीनिवडींची, इच्छा-आकांक्षांची आणि पुढे विचारांची गळचेपी करायला लागतात.

याला वेगळं ‘पडायची’ भीती म्हणावं की वेगळं ‘करायची’ धास्ती ते कळत नाही. पण यामुळे अनेक होऊ शकणा-या गोष्टी होत नाहीत, अनेक घडू शकणारी व्यक्तिमत्व घडत नाहीत, अनेक विचार मांडले जात नाहीत, अनेकदा जे म्हणायचं असतं ते म्हटलं जात नाही कारण एकच; ‘लोक काय म्हणतील...’ माझा तीव्र विरोध असलेली ही एक संकल्पना आहे.
‘लोक काय म्हणतील असा विचार करत राहणा-यांना स्वत: कधी काही म्हणताच येत नाही; किंवा त्यांच्याकडे म्हणण्यासारखं काहीच नसतं’
- अ. ज. ओक

Thursday, March 8, 2012

Man and his Company

'A Man is known by the company he keeps'. A friend of mine introduced me to this famous quote. We were discussing about some people and their nature. I thought about this quote for a while but couldn't really agree to it at all.

To elaborate, A person who befriends people who smoke and drink; does not always do, like or support what they do. A person who gets along well with scholars, is not necessarily a scholar or even who aims to be one. This reminds me of a Sanskrit Subhaashit which goes like,

विकॄतिं नैव गच्छन्ति संगदोषेण साधव: |
आवेष्टितं महासर्पैश्चंदनं न विषायते ||

It means that bad company does not induce changes (bad habits) in a good person. (as) (poisonous) snakes (cobra) on sandal tree does not cause that tree to become poisonous.
(Source: http://sa.wiktionary.org) 

I would like to focus my disagreement on the word 'known' in this particular saying. I'd rather say,

'A Man is 'judged' by the company he keeps. To 'know' him; you have to BE his company.'
- A J Oka.