Friday, June 22, 2012

हापूस

आंबा. फळांचा राजा. कोकणात याचं मूळ असलं तरी अख्या जगात याचं खूळ आहे. दुबई च्या राजा ला वगैरे सुद्धा आवडतो म्हणे आंबा. हापूस हा या फळांच्या राजाचा मुकुटच म्हणेन मी. पण Alphanso हे त्याचं नाव मला मुळीच आवडत नाही. Alphanso म्हटलं की तोच हापूस परका वाटायला लागतो मला.


हे सांगायलाच नको की मला आंबा प्रचंड आवडतो. पण काहीशी कक्षाबद्ध आवड आहे माझी. साधारण सगळ्यांना माहितच असेल की आंब्याच्या हापूस व्यतिरिक्त इतर अनेक जाती आहेत. पायरी ही त्यातल्यात्यात वरच्या पायरीवर असलेली जात. मग दशहरा, लंगडा, तोतापुरी, केसर, फज़ली, नीलम वगैरे वगैरे. काही चाखल्यात मी यातल्या पण रुचली एकही नाही. खरं बघायला गेलं तर आंबा = हापूस. इथेच विषय संपतो. माझ्यापुरता तरी. हापूस सारखा दुसरा कुठलाच आंबा नाही; दुसरं कुठलंच फळ नाही. त्यामुळे मला,



‘हापूस सोडून आंब्याच्या इतर जाती म्हणजे केवळ हापूस ची सर गाठण्याचे निष्फळ ठरलेले प्रयत्न वाटतात.’
- अ. ज. ओक

Monday, June 18, 2012

काय दिलं?


आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी देते. छोट्यात छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते, सांगते, देते.

तुम्हीच तुम्हाला प्रश्न करून बघा, उत्तरं मिळत जातील. जसा मी विचार करतो की; शाळेने काय दिलं?... चांगले शिक्षक दिले, ज्ञान दिलं, चांगले मित्र दिले, संस्कार दिले, नेहमी साथ देतील अशा आठवणी दिल्या. कॉलेज ने काय दिलं?... करियर कडे बघण्याचा दृष्टिकोन दिला, ’बीकॉम’ अशी पदवीरूपी ओळख दिली. CPA ने काय दिलं?... अभ्यासाचा practical approach दिला, अमेरिकेशी ओळख करून दिली, International (तरीही भारतातल्या अनेक बिंडोकांना संबंधित क्षेत्रात काम करत असूनही माहीत नसलेलं) Qualification दिलं. अशा अनेक अनेक गोष्टी.


अशीच एक फार मोठी गोष्ट. CA. अनेक वर्ष हातात हात, नव्हे गळ्यात गळा घालून जी गोष्ट माझ्याबरोबर होती, म्हणजे माझ्या मानगुटीवर बसली होती, तिने खरं तर बरंच काही दिलं असलं पाहिजे; आणि आहेच. पण तरीही एकच देणं नमूद करायचं झालं तर;

CA ने काय दिलं?... कोडगेपणा दिला.
- अ. ज. ओक

Saturday, June 16, 2012

You Can't See Me

World Wrestling Entertainment, is one of the very popular sports entertainment shows in the world and I am one of its millions of fans. The Rock, Triple H, Batista, John Cena being my top favorites. They all have very interesting characterizations and very interesting tag-lines or punch-lines which they say. e.g. The one of John Cena, is 'You Can't See Me'. 
Brilliant. I like it. However, as I think about this statement a little more, I arrive at a slightly different construction of words. Keeping in consideration my strong belief and respect for the idea of individuality, I think that if I was in a place as John Cena, and if I had to decide on some punch-line of mine, that line would rather be,
'You Can't BE Me'
- A J Oka.

Monday, June 11, 2012

हुद्याचा मुद्दा


परवा माझ्या एका मित्राशी बोलत असताना त्याने मला त्याच्या ऑफिसमधली एक गोष्ट सांगितली. त्याच्या बॉसच्या जागी आता त्याच्याच संचातील एका व्यक्तीची बढती झालीय. तो सांगत होता, या आधी तीच व्यक्ती माझ्याशी नीट बोलायची; छान ताळमेळ होता आमचा; आणि बढती होताच त्या व्यक्तीच्या बोलण्याचा सूर बदललाय; विद्यर्थ जाऊन आज्ञार्थ आलाय...
मी म्हटलं अरे हे होतंच बरेच वेळा.



‘हुद्दा नसेपर्यंत सगळेच ‘मुद्याचं’ बोलतात; आणि एकदा हुद्दा आला की ‘हुद्याचं’’
- अ. ज. ओक