Saturday, December 31, 2011

Revolution

I don't believe in New Year resolutions. So I don't like to ask or to be asked about them. But I always hear the high claims that people make in excitement. Those claims fade away quickly in just a few days. Our mind will always challenge what we impose on it. Resolutions are the best examples. But our mind will seldom counter what originates from within itself. 



'It takes a REVOLUTION and not a RESOLUTION, for a mind to do wonders.' 
- A J Oka.

Tuesday, December 27, 2011

लक्षण आणि गुणधर्म

रोज येणारे मार्केटिंग चे कॉल, रोज आपली वेळेची गणितं चुकवणारा ट्रॅफिक, रोज डोक्यात जाणारी गर्दी, रोज सोसायला लागणारी असुविधा, या रोजच्या गोष्टींबद्दल रोज राग व्यक्त केला जात नाही. त्या गोष्टी पहिल्या काही वेळा घडतात, दिसतात तेंव्हा आपल्याला खूप राग येतो. पण त्या सतत व्हायला लागल्या की, जरी राग तितकाच आला तरी तो तितक्या प्रखरतेने व्यक्त होत नाही. 

एखादी गोष्ट आपल्याला खटकत असते. त्याबद्दल वारंवार चर्चाही होत असते. पण कालांतराने त्या गोष्टीविषयी भाष्य करून आपली नाराजी दर्शविण्यातही आपल्याला स्वारस्य उरत नाही किवा तशी इच्छा उरत नाही. तरीही मनातली ती नाराजी कायम असते. तो राग नाहीसा किंवा कमी होत नाही. पण सोबतच्या व्यक्तींची धारणा, त्यांचा समज नक्कीच असा होतो की तो राग, ती नाराजी निवळली असावी किंवा गेली असावी. बदल लक्षणात होतो, गुणधर्मात नाही. कसं आहे, की,


’दगड बोथट झाला म्हणून त्याचा कठीणपणा कमी होत नाही.’  
- अ. ज. ओक

Sunday, December 25, 2011

रोल्स रॉईस

मोबाईल, गाडया, राजकारण आणि सिनेमे हे फावल्या वेळातल्या चर्चेचे चार मुख्य विषय आहेत. त्यापैकी राजकारण हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. पण बाकी तीन हल्लीच्या काळात वाढलेत. तर अशीच त्या दिवशी गाड्यांविषयी चर्चा चालू होती. एका व्यक्तीने रोल्स रॉईस चं वर्णन सुरू केलं, आणि एक महाभाग उत्तरला, ’अ‍ॅव्हरेज किती देत असेल रोल्स रॉईस ?’ मी म्हटलं,



’रोल्स रॉईस चं अ‍ॅव्हरेज विचारणं, म्हणजे पॅमेला अँडरसन ला ’स्वयंपाक करता येतो का?’ असं  विचारण्यासारखं आहे.’
- अ. ज. ओक

Thursday, December 22, 2011

Being 'High'

The year is about to end, and the ever popular occasion to celebrate is approaching. On that day, the pubs in the city will be full, the restaurants will have a long queue outside. There will be parties all over the city, including the roads. Some people will be high on alcohol, some will be high on something else, and almost everyone will be high on excitement and joy.



'Speaking about being 'high'; I feel that as long as one is high on principles and ideals, he won't feel the need to get high on anything else.' - A J Oka.

Sunday, December 11, 2011

सोल / Soul

’जोडीदार आणि पादत्राण निवडण्यामधे सर्वात महत्वाची गोष्ट समान आहे. ’सोल’ चांगला असला पाहिजे. बाकी सगळं दुय्यम.’
- अ. ज. ओक




The most important thing is common when it comes to choosing a life partner and footwear. 'The Soul (Sole)' has to be good.'
- A J Oka.

Saturday, December 10, 2011

माणूस तेंव्हा चुकतो..

एकदा एक मुलगा रस्ता ओलांडत होता. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र होते. तसा तो मुलगा अगदी शांत आणि गोष्टी सांभाळून करणारा होता. पण त्या दिवशी रस्ता ओलांडण्यासाठी पाऊल पुढे टाकणार इतक्यात त्याच्या मित्राने मागून त्याला सांगितलं "थांब थांब ती गाडी जोरात येतेय"... लगेच दुसरा मित्र म्हणाला, "अरे नाही रे ती लांब आहे, चल." टाकलेलं आणि पुन्हा मागे घेतलेलं पाऊल त्याने पुन्हा पुढे टाकलं; ते त्या गाडीला धडकून पडण्यासाठी.

हे एक छोटं उदाहरण झालं. पण दररोज माणूस शेकडो गोष्टी करतो. अनेक निर्णय घेतो. त्यासाठी माहिती असलेल्या आणि नव्याने माहिती झालेल्या कित्येक गोष्टींचा तो विचार करतो. आपापल्या विचारांनुसार अंदाज बांधतो, गणितं मांडतो. हे सगळं करताना त्याचा मेंदू आणि त्याचं मन, दोघे एकमेकांशी ताळमेळ साधत काम करत असतात. 



आणि मग अशा प्रक्रियेत त्याला मिळतात, अनेक सल्ले, अनेक उपदेश, बहुतेक वेळा त्याच्या कल्पनेला बगल देणा-या अशा अनेक कल्पना, आदेश, आणि बरंच काही. इथे त्याचा मेंदू संभ्रमित व्हायचा सर्वाधिक संभव असतो; आणि बहुतेक वेळा तो होतोच. मग घडतात चुका, घोळ, आणि गडबडी.

हे सल्ले प्रत्येक वेळी चुकीचे असतात असं मला म्हणायचं नाही. परंतु प्रत्येक जण एखाद्या कामात त्याची स्वत:ची अशी काही गणितं मांडत असतो, त्यानुसार निर्णय घेत असतो... या प्रक्रियेला ते नक्कीच ’डिस्टर्ब’ करतात. आत्तापर्यंतच्या माझ्यासकट जगातील अनेक माणसांच्या झालेल्या चुका, आणि गल्लती बघून मला एवढंच म्हणावंसं वाटतं, की

"माणूस तेंव्हा चुकतो, जेंव्हा त्याचा विचार, त्याची विचारप्रक्रिया, त्याची विचारधारा कुणीतरी बदलायचा किंवा प्रभावित करायचा प्रयत्न करतं."

- अ. ज. ओक.